श्रीरामी रामदासकृत (श्रेष्ठी)
श्रीनरसिंह -अवतार- आख्यान -
नमो नारायणा नरहरी । नमो जगदीश्वरा नृकेसरी
नमो सिंहानना श्रीहरी । नमो प्रल्हादवरदा ।।१ ।।
नमो भक्तापत्तिउद्धारणा । नमो दैत्यवारणाविदारणा
नमो भूमिभार हरणा । आनंदकंदा मुकुंदा ।। २ ।।
मच्छरूपा शंखातका । वेदांतवेद्या वेदोद्धारका
भुवनत्र य कल्याणकारका। विश्वंभरा विश्वधरा ।। ३ ।।
कूर्मरूपा मंदर धरा । पृष्ठीभागीं धरली धरा
श्वेता वाराहा हिरण्याख्य वीरा। उधळून जीवेच मारिले ।। ४ ।।
जीवे मारावयाची हातवटी । तुज साजे जी जगजेठी
परतोनी मागुते जीवत्व नुठी । तो एक एकांज वीर तू।। ५ ।।
हिरण्याक्ष हिरण्यकशिपू सोहोदर । दोघे दुर्धर महावीर
हिरण्याक्ष केला संहार । वराहवेषे।। ६ ।।
त्यानंतर दशनसिखरी । धरणी धरूनि राहिला हरी
एकटा उरला संसारी दुस्तरी । हेम कसीपु महादेत्य ।। ७ ।।
तो देवांचा मुल्वैरी । श्रीहरी देवांचा कैवारी
हरीसहित अभ्यंतरी । द्वेषी सर्वां सुरांसी ।। ८ ।।
पुर्व प्रकरणी श्रीपती । चोळ द्विज नेले स्वपदाप्रति
आतां परिसा प्रल्हादाची ख्याती । जे लोकत्रय विश्रुत ।। ९ ।।
प्रल्हादाची प्रेम अदभुत । स्मरण निर्धार सदोदित
वर्णावया वाणी कुंठीत । अतूळ निष्ठा जयाची ।। १० ।।
ज्याचे चरित ग्रंथांतरी । विस्तारे वर्णिले ऋषेश्वरी
ते भक्तीरहस्य संक्षेपेकरी । परिसा आता सज्जन ।।११ ।।
हरीभक्तिचा महिमा विस्तरे वर्णावयासी कोण पुरे
बहुत बोलोनी हि न पुरे । मती ऐसे च बोलती ।।१२ ।।
आता असो कांचनकसिपू । जगज्ज्याचा धरूनि संकल्पु
महात्त्प तपसे वपु । मन इंद्रिये नेमिली । । १३ । ।
उग्रतप मांडिले अतूळ पावावया विषयो विशाळ
मुर्धीपसावा प्रकटला अनळ तापोतेज अदभुत । । १४ । ।
तणे तपो लागला नक्षत्रलोक देव जाले अति साशंका
आसने द्ल्म्ळूनी इंद्रादिका । शरण गेले ब्रम्ह्या । । १५ । ।
हे जाणोनि हेमकसिप्रती । ब्रम्हा आला पावोनी प्रीती
वरत्रय माग म्हणे स्वयंज्योती । स्वयंभू चतुरानन । । १६ । ।
येरें केले साष्टांग प्रणमय । वर मागता झाला अनुपम्य
त्रैलोक्याधिपत्त्या रम्य । अद्वैत प्रभुती मज द्यावि ।। १७ ।।
अशेष विजयो देई आतां । तथास्तु म्हणे तो विधाता
मज मृत्यू नसावा तत्त्वता । ब्रम्हा म्हणे हे न घडे ।। १८ ।।
मृत्यू निरसाव जेणे योगे | तया योग्य नाहिसी तूं निजांगे
देहमते सारिखे मागे | त्यासी वैराग्य पाहिजे || १९ ||
जितुका जन्मला प्राणी | तितुका नाशे हे वेद वाणी
स्व काळे सर्व शमती हे पुराणी | प्रसिद्ध च आहे || २० ||
दैत्य पती म्हणे सत्यलोक पती | मज मृत्यू नसो दिवसा निसी प्रती
स्वर्गीं पाताळी अथवा क्षिती | नसो सचेतने अचेतने ||२१ ||
जळे अनळे न हो विषे | शस्त्रे शापे येणे मिसें
मानव दानव सुखेषे | सजीव अजीवें नसावा || २२ ||
ब्रह्मा म्हणे दैत्य नाथा | इच्छिले पावसी नान्यथा
हरीभक्त ना द्वेषी सर्वथा | तन्मुळे मृत्यू तुज लागी || २३ ||
करिता हरिभक्ताचा द्वेष | घडोनी येती सर्वही दोष
तयासी कैचा ग संतोष | अविनाश नाशे तत्वता || २४ ||
ऐसे सांगोनि दैत्य राष्ट्रा| स्वस्थानासी गेले त्वष्टा
यानंतरे सामर्थ्या उत्कृष्टा | प्रकाशी रवी किरणेव || २५ ||
दिन्कारोदयी गगनभरी | तारा तारा पति लोपती अंबरी
तैसा देवांसहित देवेश अमर पुरी | हतप्रभ जालासे || २६ ||
जैसी निराभासी साभा सता | अपार प्रकाशिली स्वतां
तैसी हिराण्याकासिपू ची सत्ता | ब्रह्मवरे सर्वत्र || २७ ||
या नंतरे सूर शरणागत | कर जोडोनी वोळगती दुतवत
आज्ञा धारक सेवकभूत | राज्य दैत्य नाथाचे || २८ ||
तयाचे आज्ञेप्रमाणे | चालविती ब्रह्मांड कारणे
दंडनीती मुद्रा धरणे | शास्ता दैत्याधीश तो || २९ ||
कुबेर तयाचा भांडारी | दिग्पाळ ज्याचे मेटकरी
एवढेन ऐश्वर्ये राज्याकारी | राजा हिरण्य कश्यपू ||३० ||
तयाची जे का पुण्या वधू | परम पतिव्रता कयाधू
तयेचे उदरी गुण सिंधू | गर्भ असता प्रल्हाद || ३१ ||
ते पुरंदर बंदी होती | जैसी विषयी वेष्टीली मती
शोकरूप असतां तये प्रति | सद्गुरू नारद प्रबोधी || ३२ ||
तेणे शुद्ध शास्त्र बोधे | प्रल्हाद गर्भामाजि बोधे
दैत्येशे देव जिंतोनिया युद्धे निजांगना आणिली उत्साहें || ३३ ||
नगरी लागली बाधावणे | घरोघरी गुढिया तोरणे
मंगल वाद्ये वाजती निशाने | प्रताप वर्णिती प्रभूचा || ३४ ||
भुवनत्रयाचेनी ऐश्वर्ये | राजा शोभे सर्व कार्ये
महर्षि स्तविती परम ऐश्वर्य | तपसामर्थ्य तयाचे || ३५ ||
नवविधा भक्ती नाव मास | पूर्ण प्राप्ती अष्टभाव पूर्ण दिवस
स्वप्रकाश बोध पुत्र जाला तीस | भक्त राज प्रल्हाद || ३६ ||
रायें केला परम सोहळा | पुत्रमुख अवलोकिले लिळा
तेणे पुण्ये हरि घननीळा | प्रत्यक्ष दृष्टीं देखिला || ३७ ||
बहुत केले दानपुण्य | केले स्वस्ति पुण्याहवाचन
त्याचे फळ जगज्जीवन | साक्षात्कारे भेटेल || ३८ ||
हो कां भक्ती अथवा वैर | पावलिया परमेश्वर
सांसारिक पूर्व शरीर | सांडावेचि लागे || ३९ ||
विष्णू आत्मा निर्विशेष | त्याचे स्वरूपी होय प्रवेश
तोच जाणा प्राप्ती पुरुष | वैरें अथवा भाक्तीतां || ४० ||
आतां असो हे राजपुरुष | वाढो लागला लीला स्वतंत्र
तेणे चरिते अति विचित्र | म्हणे हरि नारायण गोविंद
दैत्य म्हणती हा प्रमाद | जीवनाश होईल || ४२ ||
तूं जयाचा आत्मज | विरुध्द बुद्धी तयासी तुज
हें तरि मांडले परम चोज | निद्वन्द्वी मिथ्या द्वन्द्वता || ४३ ||
आईक बापा आमचा मंत्रू | तुझा पिता म्हणे मी हरीचा शत्रू
तू हरिभक्ती करितां पुत्रु | हरी रूपच कीं जालासि || ४४ ||
तरि सांडि हें जन विरुद्ध | आम्ही प्रवृत्तीचे पंडित प्रसिद्ध
पूर्वमीमांसक अनुभवसिद्ध | प्रत्येक्ष प्रत्ययकारक || ४५ ||
प्रत्यक्ष देखि जे हेच सत्य | दृष्टी न दिसते असत्य
कर्मफळ तेंच नित्य | पाविजे तया कर्तृत्वे || ४६ ||
तुझा पिता परम तपे | भुवनैक भूप झाला प्रतापे
तैसा च तू हि पुत्र तद्रूपे | पावसी भववैभवा || ४७ ||
राजा कृपा करिल तुज | जना आवडेल हें सहज
देवा प्रियकर हें काज | विषयानंदे नांदावे || ४८ ||
येते काय करावा हरि | कर्मप्रधान चराचरीं
येणे सिद्धांते करिती जनीं | परि तो प्रल्हाद उत्पन्न ज्ञानी
तो न भृंशे हरि भजनी | त्यांची हि म्हणे हरि म्हणे || ५० ||
जो हरि कर्माचा भोक्ता | जो हरि कर्म फलाचा दाता
जो हा भोगा योग्य होय स्वतां | तो यत्न करूनि करीं दे || ५१ ||
हरीनाम स्मरणे कर्म | निउनां ते संपूर्ण होय हें शास्त्रवर्म
हरि भक्ती योगे सर्व धर्म | सिद्धीते पावती हरिकृपा || ५२ ||
देखोनि प्रल्हादाचा निर्धार | पुरोहित झाले भयातुर
तयाचा सर्व समाचार | निवेदिला रायासी || ५३ ||
रायें पाचरिला प्रल्हाद | तवं तो देखिला अद्वयानंद
राम कृष्ण गोविंद | म्हणत च आला निः शंक || ५४ ||
नृपनाथ म्हणे नंदना | कैसा स्मरसी दैत्यकंदना
मज देखिता करिसी वंदना | नामे स्मरसी आवडी || ५५ ||
माझिये उदरी जन्मोनि | मजचि जालासी शत्रू स्थानी
माझा वैरी ध्यानी मनी | वदनी सदनी स्मारतोसि || ५६ ||
ऐसा शास्त्रीचा निर्धारु | पिता तोच होय गुरु
पुत्र केवळ आज्ञाधरू | मम अवज्ञा करितोसि || ५७ ||
प्रल्हाद म्हणे जी देहजनका | देह दयाळा प्रतिपालका
तरि या देहान्तारा अनेका | नेणवे जगदेक भूपति || ५८ ||
तुज मज सहित सर्व हि लोक | यांचिये जीवन कलेचा जनक
सर्व भूत सुहृद जगन्नायक | पालक चालक विश्वाचा || ५९ ||
तूंहि शरण जाई तया हरि | तो आत्मा सर्व चराचरी
तू तयाते म्हणसी वैरी | हा सांडी मिथ्या अहंकार || ६० ||
दैत्य मरती देव तरती | हे आपुलिया सुष्ट दुष्ट कर्माची गती
आत्मा समान सर्व भूतीं | नारायण अनामय || ६१ ||
प्रल्हाद म्हणे आईक ताता | जव न कळे पितामहाचा पिता
तव च पिता पुत्र देहममता सत्य वाटे संसार || ६२ ||
प्रत्यक्ष हरिरूप चराचर | हरिमय तुझे शरीर
सर्व शरीरि शरीरि अक्षर | सांडी नात्रिली शत्रुता ||६३||
ऐसें बोलता प्रल्हाद | राजा पावला परमखेद
शुद्ध बोधे पावे प्रमाद | पाखंडी जैसा || ६४ ||
सृष्टिक्रम कल्पितं ईश्वरे | भेद प्रतिष्ठी जे आदरें
तेणे अभेद बोध लोपूनि शबलाकारें | व्यापिलें विश्व भवजाळ || ६५ ||
तैसा विधिवरे कीळकश्यपु | भुवनत्रयी कृतप्रतापु
ते देह्तेचा ठायी ज्ञानदीपु | पुत्र जाला प्रल्हाद || ६६ ||
तो मूर्तिमंत द्वैतबोध | त्याचा द्वैतपितया परम्क्रोध
तन्मुळे आपणां मांडला वध | न पाहे म्हणौनि मुख त्याचे || ६७ ||
धरा धरा मारा मारा | मज पासूनि न्या दुराचारा
क्रोधें कापतसे थरथरा | दृष्टि गरा गरा फिरतसे || ६८ ||
द्वैतशास्त्रशस्त्री छेदा | विषय बाणजाळे भेदा
सबळगघातें चेंदा | करा मस्तक याचा || ६९ ||
तवं प्रल्हाद परमानंदी | पुढे चाले राजबदी
भोवती नागरिकांची मांदि | येरू हरिपदी गर्ज्जतसे|| ७० ||
रामा कृष्णा मधुमर्दना | सेवक पाळा सुखवर्धना
हरि माधवा जनार्दना | विश्वम्भरा हृषीकेशा || ७१ ||
गुज सज्जन बोलती | मिथ्या द्रोही हा भूपती
स्वप्रकाश आत्मजघातीं | पापरूप तो हा च ||७२ ||
व्यर्थ याचा हा आवेश | हरि सर्वत्र स्यप्रकाश
मेघपटलेआकाश | काय लोपे पसरल्या || ७३ ||
कैसे बाळहे वल्हाळ |करी हरिनामे गदारोळ
विश्व जालासे प्रेमळ | म्हणती देवा तूं पावे || ७४ ||
ऐसा आला महाद्वारा | नगरी होतसे हाकारा
दूर धावत सैरावैरा | प्रल्हादासी दंडिती || ७५ ||
नवल भक्तीचा निर्धार | करितु नामाचा गजर
वीर करिती शास्त्रमार | ते सुकुमारा न लगती || ७६ ||
प्रल्हादासी लागती घात | म्हणौनि पूर्वीच भगवंत
विश्वरूपे सदोदित | होऊनिया राहिला || ७७ ||
मद मद गज प्रेरिले वरी| एक स्मरे नरकेसरी
भेणे पळती दुरिच्या दुरी | नृत्य करी हरिनामें || ७८ ||
दर्प रूप कर्कोटक | पुच्छ पिळुनी क्षोभात्मक
वर्मांगी लाविलें अनेक | विषम बुद्धी उलथिली || ७९ ||
बाळ स्मरे गरुडध्वजा | विष निर्विष जाले सहजा
गळोनी पडले प्राण काजा | प्रिथवीमाजी प्रवेशले || ८० ||
यंत्रपात पर्वतपात | प्रल्हादासी न करी घात
प्रलयानळ सीतल जल होत | स्थळरूप ते हरिनामे || ८१ ||
न तुटे न बुडे न उडे न जळे | हरिस्वरूप न सरे न चळे
ते प्रल्हादे प्रेमळे | अंतबार्ह्या स्मरिजें ते || ८२ ||
नित्यस्मरणे तन्मयता | तो पावलासे तत्त्वता
सघन जाली सबाह्यता | कैचा न अविनाशा || ८३ ||
विकल्पवीषहि जननी हाता | देवविले पुत्राप्रती
परि तो निर्विकल्प स्थिति | अभिनव प्रल्हादाची कळा
जाच न लगे एकि हेळा | नामें हरीची स्मरतसे ||८५ ||
राजा बैसे सिंहासनी | प्रल्हाद आणिला बहोनी
तुझा हरि तो कवणे स्थानी | सांग आधी वधीन || ८६ ||
बोले प्रल्हाद निर्भय | हरि सर्वत्र अज अव्यय
आत्माघात तो स्वकीय | जीव पावे तद्वेशे || ८७ ||
खड्ग कवळूनि रोषें पाहे | हरिया स्तंभामाजी आहे
होय म्हणतां म्हणताहे | घावें स्तंभ उतटला || ८८ ||
फुटली कल्पांत आरोळी | धाके वसुधा हे डळमळी
तडक फुटला अंतराळी | दशहि दिशा दुमदुमल्या || ८९ ||
दाढा विकराळा व्यंकटा | नाखाग्रिका अति तिखटा
ज्वाळा निघती नैत्रवाटा | आंगी छटा तरकती || ९० ||
तेज अद्भुत प्रकट जाले | तेणे चराचर लोपलें
गगन साघनतां कोंदले | सदोदित स्वयें च || ९१ ||
कैंचे जीव कैचा भाव | अपरंपार तेजार्णाव
तेजे तन्मय जाले देव | देह्स्मरण राहिले || ९२ ||
हिरण्यकश्यपु देतां हांक | भुवनत्रयी पडला धाक
शमलें त्वपद शबळकटक | शुद्ध युद्धा मिसळले || ९३ ||
द्वंद्व युद्ध अति तुंबळ | होतां क्रमले बहुत काळ
भेदशत्रूहि प्रबळ | एकमेका अक्रमती || ९४ ||
कौतुक पाहती सूर - असुर | असुरा भेदाख्यनृपवर
सुरांसी अभेद नरहरी वीर | जयकल्पना करिताती || ९५ ||
तवं पातली पूर्णवेळ | भेदित असतां तो भूपाळ
ते गवसिले तनुतामुळ | कंठनाळ फोडिले || ९६ ||
शत्रू संहारिला भेदु | हरला त्रैलोक्याचा खेदु
प्रकट झाला परमानंदु | जयजयकार नीजविजये || ९७ ||
स्वतां शोषुनिया शुद्ध | नरहरीरुपें तनुता शुद्ध
अंतर्माळा ले प्रसिद्ध | स्वकीयालंकार बुद्धी || ९८ ||
सूक्ष्म समरसे स्वलीळा | सामरस्यीं भीती स्थूळा
म्हणवुनीया अंतर्माळा | हरि स्वरूपी मिरवितु || ९९ ||
अभेद हरिरुपीं केवळ | भासतां हि सूक्ष्म स्थूळ
स्वकीयावेषें अंतरजाळ | स्वस्वरूपी मिरवितु || १०० ||
ज्याचा देह भक्तजनक | तो न म्हणावा निरर्थक
म्हणौनि केलेसे सार्थक | अंतरमाळा लेऊनि ||१०१ ||
भेदशात्रू वधूनि अभेद | जय पावलासे गोविंद
तोहि प्रताप करिता खेद | बोध प्रल्हाद सांवरी || १०२ ||
हरिपदद्वये मेळवूनी | प्रल्हाद लीन जाला नमनीं
परमानंद प्रकट जनी | जनार्दनी निज भेटी || १०३ ||
लक्ष्मी संमिळित वामांकित | नमन स्तवन केले लोकीं
दास स्थापिला अभिषेकी | आत्मभद्री निजभद्रे || १०४ ||
भक्ता स्वानंददायक | कैंचा क्रोध वैरादिक
लीला वैकुंठनायक | स्वकीय भावे तनुधारी || १०५ ||
करूनि दुष्टाचा संहार | श्रीहरी भक्तलोभापर
अदृश्य जाला सर्वेश्वर | देव गेले स्वस्थाना || १०६ ||
जें हे हरिचरित स्वभावे | गाती ऐकती गौरवे
ते हरिरूप होती भावें | भवेसहित प्रेमळ || १०७ ||
सर्व पुण्यश्रव सफळ | चरित श्रीहरीचे मंगळ
पुढे परिसोत प्रेमळ | परमानंद दायक || १०८ ||
स्वस्ति श्रीभक्तिरहस्ये | रामिरामदासकृते
विष्णू महिमा वर्णने | प्रल्हादोपाख्यान ||
नाम प्रकरणं समाप्तं ||
No comments:
Post a Comment