Monday, February 25, 2013

श्री लक्ष्मी नृसिंह रूण मोचन स्तोत्र


देवकार्य सिध्यर्थं सभस्तंभं समुद् भवम |
श्री नृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ||1||
लक्ष्म्यालिन्गितं वामांगं ,भक्ताम्ना वरदायकं |
श्री नृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ||2 ||
अन्त्रांलादरं  शंखं ,गदाचक्रयुध धरम् |
श्री नृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ||3||
स्मरणात् सर्व पापघ्नं वरदं मनोवाञ्छितं |
श्री नृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ||4||
सिहंनादेनाहतं , दारिद्र्यं बंद मोचनं |
श्री नृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ||5||
प्रल्हाद वरदं श्रीशं , धनः कोषः परिपुर्तये |
श्री नृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ||6||
कुरग्रह पीडा नाशं ,कुरुते मंगलं शुभम् |
श्री नृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ||7||
वेदवेदांगं यद्न्येशं ,रुद्र ब्रम्हादि वंदितम् |
श्री नृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ||8||
व्याधी दुखं परिहारं ,समूल शत्रु निखं दनम् |
श्री नृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ||9||
विद्या विजय दायकं ,पुत्र पोत्रादि वर्धनम् |
श्री नृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ||10||
भुक्ति मुक्ति प्रदायकं ,सर्व सिद्धिकर नृणां ||
श्री नृसिंह महावीरं नमामि ऋणमुक्तये ||11||

उर्ग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तम् सर्वतोमुखं |
नृसिंह भीषणं भद्रं मृत्य मृत्युं नमाम्यहम |
: पठेत्  इंद् नित्यं संकट मुक्तये |
अरुणि विजयी नित्यं , धनं शीघ्रं माप्नुयात्  ||

|| श्री शंकराचार्य विरचित सर्वसिद्धिकर ऋण मोचन स्तोत्र संपूर्णं |   
 || गुरुवर्य शरणं समर्पयेत् ||

Wednesday, December 26, 2012

Dwibhuja Narasimha


यवतमाळ जिल्ह्यातील पुसद हे तालुक्याचे ठिकाण. या गावातील अटकेश्वर वोर्डात हे नृसिंह मंदिर आहे. हि पुसदची जुनी वस्ती आहे. ह्या मूर्ती व मंदिराविषयी दंतकथा लोक मानसात रुजली आहे. असे सांगतात कि, कशीच्या एका ब्राह्मणाला साक्ष्त्कार झाला व त्याने गावातील १. उकिरडा बाजूस करावयास सांगितला. त्या खाली एक मोठी उभी शिळा दिसली. ती शीळा बाजूला केल्यावर मूर्ती नजरेस पडली. हि मूर्ती जेथे सापडली तेथेच चौथरा बांधून मंदिर बांधले. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नागारखाना आहे. येथून आत गेले ६ पायर्या चढून सभामंडप लागतो. चुन्यात बांधलेला हा मंडप प्रशस्त असून छत उंच आहे. समोरच्या भिंतीला असलेल्या लहान झरोक्यातून गाभार्यातील नरसिंहाच्या उजव्या पायाचे व पितळी पादुकांचे दर्शन घडते. ५ पायर्या उतरून गेल्यावर गाभारा नजरेस पडतो. मूर्ती प्राचीन आहे. काहींच्या मते २००० वर्ष पूर्वीची तर काहींची ५०० वर्ष जुनी असा मत आहे. मूर्ती यवनांच्या भीतीपोटी लपवली असा अंदाज आहे. नरसिंह मूर्ती काळ्या पाषाणाची असून मूर्तीवर वज्रलेप केला आहे. मूर्ती द्विभुज असून ४ फुटाची आहे. एका हातात चक्र तर दुसरा हात मांडीवर ठेवला आहे. हातात बाजूबंद असून यज्ञोपवीत परिधान केले आहे. नार्सिन्हाचा चेहरा सौम्य असून नजर थोडी झुकलेली  आहे. जटामुकुट परिधान केला असून बाजूला प्रल्हाद व लक्ष्मीच्या अंजनी मुद्रेतील मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ असून पाठीमागे विष्णूची चतुर्भुज मूर्ती भिंतीत बसवली आहे. विष्णूच्या बाजूला मध्यभागी सरस्वती व डाव्या बाजूला कालियामर्दन कृष्णाची मूर्ती आहे. 
नृसिंह जयंती ९ दिवस साजरी केली जाते. भंडारा होतो व साधारण १०००० लोक त्याचा लाभ घेतात.

Sunday, December 2, 2012

Narsimha... avtaara nantar


मुल्तान येथे  प्रल्हादाने नृसिंह मंदिर बांधले आपल्या देव्रोचन नावाच्या पुत्राला येथील राज्य देउन दंडकराणयाधिपति महंकवाती नरेश केले. प्रल्हादाला दहा मुले होती.मोठ्या विरोचन नावाच्या मुलाला मुल्स्थांचे राज्य देउन नउ मुलांना नऊ अरणयानची राज्ये दिली.

दंडकारण्य या मुलाला देऊन बाकी आठ मुलांना दिलेली आठ अरणयप्रदेश असे . पुष्करण्य .अर्बुदारण्य (अवधूत पर्वत), .  महेंद्रान्या . शैलारण्य..  हिमारण्य (काश्मीर).. पंचारीकाराणय(कर्नाटक) . धर्मारण्य (गुजरात) . नैमिशरण्या (.प्र).

हि घटना कृतयुगातील त्यानंतर कृतयुग संपून त्रेतायुघहि संपण्याच्या अंतिम टप्प्यावर आले होते तेव्हा प्राग्ज्योतीषंपूर  (गुहाटी) चा बाणासुर हा प्रलहादाचाच वंशज होता. हा परमशिवभक्त होत पण विष्णुद्वेषी होता. परम विष्णुद्वेषी हिरण्याकशपुच्या पोटी जसा परम विष्णु भक्त प्रल्हाद जन्माला आला. बाणासुराला क्रांतासुराची हि नृसिन्ह भक्ती मान्य नव्हती म्हणुन त्याने क्रांतासुराला आपल्या राज्यातून सपत्नीक काढून दिले.

क्रांतासुराची पत्नी कांचनप्रभा हि महनकावती नरेश हिर्ण्यामायाची एकुलती एक मुलगी होती. हिरण्याला हि बहिश्कृतीची माहिती होताच त्याने जावयाला मुलीला बोलावून घेतले  महनकावती  चे राज्य देऊन आपण सन्यास घेतला त्याच राज्यांतर्गत असलेला दंडकारण्यातील गोदावरी काठच्या पोखरणी(पुष्करणी) येथे  नृसिंह सांन्नीध्यात ताप करण्यास निघून गेला.

पुढे क्रांतासुराला दोन मुले झाली , पैकी मोठा मेघनकर लहान लवणासूर, क्रांतासुराने सन्यास घेणयाअगोदर दोन्ही मुलांत राज्य विभागून देले. दकशीणेकढील विराज नावाचे राज्य लवणासूराला दिले.त्यांची राजधानी विरज म्हणजे सध्याची लोणार येथे होती.त्याने दक्षिणेकडे विस्तृत राज्य विस्तार केला.मेघनकराचे राज्य बाकी तिन्ही देशांनी ८०० योजन म्हणजे १६०० कोस विस्तृत होते.

हे दोन्ही वंशज वरणाने जरी ब्राम्हण होते तरी त्यांचा वंश तर राखसाचा होता. त्यामूळे  तपोनिषठा  हि राक्षसाची होती. मोठा भाऊ मेघांकाराचे राज्यात प्रणितेसारखी  परम्पावणी नदी राजधानी सांनिध आहे.तर आपल्या येथे का नसावी म्हणून लवणासुराने कठोर तपसामर्थ्याने गंगेची धारा आपल्या राज्यात आणली.इकडे मेघनकरही परम नृसिंह भक्त होता हा हि नृसिंहाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी उग्र तप करीत होता.हा ब्राह्मण कुलीन राक्षस असला तरी परमश्रेष्ठ नृसिंह भक्त होता. हा श्वासही नृसिन्हनामाशिवाय घेत नसे.हा महान पुण्य पुरुष होता.

मेघनकराचा लहान भाऊ लवणासूर हा सांप्रतच्या लोणार या नगरीत राहत होता.लवणासूर अति बलाढ्य कृर्कार्मी होता.प्रभू रामचंदरान दूताकरवी वार्ता कळली कि दक्षिणेत महंकवती क्षेत्री पुनरपि रावनपेक्षा बलाढ्य शक्ती उदित होत आहे.ज्येष्ठ बंधू मेघ्न्काराच्या पुण्याशक्तीचे संरक्षण लवाणासुराला असून हा लवकरच अवध्य होईल कारण हा स्वतःला मेघ्न्काराचा मांडलिक म्हणवितो मेघंकर हा अतिशय शक्तीसंपन्न सत्वशील,नीतिमान नृसिन्ह्नाम्धारक आहे,त्यामुळे विष्णुनाम धाराचा पराजय स्वतः विष्णूहि करू शकत नाही.अशी विष्णुनची प्रतिज्ञा आहे.पुढे मागे ल्व्नासुराचे सह्यास मेघंकर आल्यास लवणासुर अवध्य होईल म्हणून योग्य वेळेस मेघांकारास प्रभने दर्शन देऊन कृतार्थ करावे पुढील अनर्थ टाळावा.हि गुतांची विनंती प्रभू रामचंद्रानी त्वरित मान्य करून सेनेसह्वार्तमान महन्कावती नगरीकडे प्रस्थान केले.

प्रभू वनवासात असताना दंडकारण्याचा सर्व भाग प्रभूनच्या पदधुळीने पावन झालेला होताच.आधीच पावन झालेल्या ह्या भूमीला मेघ्न्कराचे  निमित्ताने पुनश्च प्रभूपादस्प्र्शाचे भाग्य प्राप्त झाले.यथाकालीन प्रभू रामचंद्र म्हनकवटी नगरी संनिध,उत्तरभागी, पतीतपावन ,उर्ध्व्गामिनी ,दक्षिणगंगा प्रणीतेच्या तीरावर येऊन पोहोचले.काही सैन्य घेवून प्रभुने शत्रुघ्नास ल्व्नासुरावर विजयार्थ लोणार कडे पाठवले.


अयोध्या नरेश श्री. प्रभू रामचंद्र आपला आप्ल्या बंधूंचा पराजय करण्यासाठी आलेले असून स्वतः विष्णूचा अवतार हि म्ह्णून घेतात.म्हणून या रामाने मला माझे अंतर्ध्यानरुपी नृसिहाचे रुपात दर्शन द्यावे.अन्यथा माझ्या हातून मरण पत्करावे.अश्य कृत्नीश्च्याने मेघ्न्कराने प्रभूवर त्वेषाने चढाई केली. पण युद्धाला सुरवात होण्यापूर्वी पर्भूंनी स्वतः हून मेघन्क्रचे नित्य ध्यानात असणारे हिराण्याक्ष्पुचे पोट फाडीत असतांना एक हाताने प्रल्हादास आशीर्वाद देणारे सायुध श्री नृसिंहाचे स्वरूपात दर्शन देले मेघ्न्क्रास कृतार्थ केले.

तिकडे ल्वणासुराला "मी प्रभुला शरण आहे,तुही प्रभूला शरण ये, हि मेघ्न कराने आज्ञा केली.ती ल्व्नासुराने अमान्य करून शत्रुघ्नशी लढाई केली त्यात मारला गेला.मेघ्न्क्राने आपले राज्य प्रभूरामम्चन्द्राला  समर्पण केले वर मागितला कि मला ज्या रुपात दर्शन देऊन कृतारथ केले त्याच रुपात माझ्या प्रजज्नांना दर्शन द्यावे. याच रुपात तेथे कायम वास्तव्य करावे.जो कोणी नृसिन्हापुढे विषणुसहस्त्रनाम पाठ करील तो कृतार्थ होईल असा वर द्या.

प्रभुने तात्काळ "तथास्तु" म्हणून आपला श्री वरदहस्त दर्शिवला "मेह्न्कावती" हे नाव बदलून "मेघंकर" हे नाव दिले. प्रभि राम्चान्दरांनी प्रणीतातीरी लक्ष्कोटी लिंगार्चन मत पितरांना पिंडदान केले. तेव्हापासून मेघंकर हि प्रल्हाद्वरद  श्री लक्ष्मी-नृसिंह कायम वास्तव असणारी परमपावन भूमी झाली.पुढे मेघ्न्क्राचा अप्भ्रंश मेहकर असा झाला शरणग्धनवा प्रभूरामचंद्र म्हणजे शारंगधर श्री विष्णु प्रल्हाद वरद श्री लक्ष्मी-नृसिंह या क्षेत्राची परम देंवत झाली.