Wednesday, December 26, 2012

Dwibhuja Narasimha


यवतमाळ जिल्ह्यातील पुसद हे तालुक्याचे ठिकाण. या गावातील अटकेश्वर वोर्डात हे नृसिंह मंदिर आहे. हि पुसदची जुनी वस्ती आहे. ह्या मूर्ती व मंदिराविषयी दंतकथा लोक मानसात रुजली आहे. असे सांगतात कि, कशीच्या एका ब्राह्मणाला साक्ष्त्कार झाला व त्याने गावातील १. उकिरडा बाजूस करावयास सांगितला. त्या खाली एक मोठी उभी शिळा दिसली. ती शीळा बाजूला केल्यावर मूर्ती नजरेस पडली. हि मूर्ती जेथे सापडली तेथेच चौथरा बांधून मंदिर बांधले. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नागारखाना आहे. येथून आत गेले ६ पायर्या चढून सभामंडप लागतो. चुन्यात बांधलेला हा मंडप प्रशस्त असून छत उंच आहे. समोरच्या भिंतीला असलेल्या लहान झरोक्यातून गाभार्यातील नरसिंहाच्या उजव्या पायाचे व पितळी पादुकांचे दर्शन घडते. ५ पायर्या उतरून गेल्यावर गाभारा नजरेस पडतो. मूर्ती प्राचीन आहे. काहींच्या मते २००० वर्ष पूर्वीची तर काहींची ५०० वर्ष जुनी असा मत आहे. मूर्ती यवनांच्या भीतीपोटी लपवली असा अंदाज आहे. नरसिंह मूर्ती काळ्या पाषाणाची असून मूर्तीवर वज्रलेप केला आहे. मूर्ती द्विभुज असून ४ फुटाची आहे. एका हातात चक्र तर दुसरा हात मांडीवर ठेवला आहे. हातात बाजूबंद असून यज्ञोपवीत परिधान केले आहे. नार्सिन्हाचा चेहरा सौम्य असून नजर थोडी झुकलेली  आहे. जटामुकुट परिधान केला असून बाजूला प्रल्हाद व लक्ष्मीच्या अंजनी मुद्रेतील मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ असून पाठीमागे विष्णूची चतुर्भुज मूर्ती भिंतीत बसवली आहे. विष्णूच्या बाजूला मध्यभागी सरस्वती व डाव्या बाजूला कालियामर्दन कृष्णाची मूर्ती आहे. 
नृसिंह जयंती ९ दिवस साजरी केली जाते. भंडारा होतो व साधारण १०००० लोक त्याचा लाभ घेतात.

2 comments:

  1. फारच सुंदर प्रवाही वर्णन केले आहे

    ReplyDelete
  2. beautiful work my dear friends thanks for valuable information shear..................!!!!

    ReplyDelete