Friday, May 6, 2011

Relation between Multan and Karvir.

मुलतान व करवीर क्षेत्राचा जवळचा संबंध 

कश्यप ऋषींच्या वंशामध्ये हिरण्याक्ष व हिरण्यकशिपू यांच्या वधासाठी श्री महाविष्णूनि वराह अवतार व नरसिंह अवतार घेतला. हिरण्यकशिपू नंतर दैत्यराज भक्त प्रल्हाद सम्राट बनला. तत्कालीन ब्रह्मवृंदाने त्यास असा सल्ला दिला कि तू पितृहत्येचे क्षालन कर, त्यानुसार प्रल्हाद गंडकी नदीच्या उगमापाशी गेला. तेथून बारा गाडे शाळीग्राम घेऊन तो करवीरक्षेत्री आला. करवीरक्षेत्री तप करीत असतांना त्यास लक्ष्मी ऐवजी प्रत्यक्ष नरहरी दिसे. अत्यंत समाधान पावून ते शाळीग्राम आजू बाजूच्या सरोवरात विसर्जन करून त्याने आपल्या आराध्य दैवताची चार मंदिरे स्थापन केली, व आनंदाने दैत्यराज  मुलतानला परतला. आजही ती मंदिरे कोल्हापुरात असून प्रल्हाद सरोवर हि आहे. म्हणूनच जेथे लक्ष्मी तेथे नरसिंह असे म्हटले जाते. अश्या रीतीने शिव शक्ती त्याप्रमाणे विष्णूमायाशक्ती हि एकत्रच असतात.
 श्री लक्ष्मी नरसिंह प्रसन्न ॥

1 comment:

  1. aapan sangtle ki karveer ani multancha sambandh thik ahe pan shaliram gadabhar anun pralhadane k atakle ulat tyala aale prabhu disu laglet tar tyane te sthpit karun ka nai thevle? ani bhaugolic paristhiticha vichar karta ha bhag jawal nai tyamule spashtikaran vhave hi ichha.
    manik vasu ...karad.

    ReplyDelete