Thursday, May 12, 2011

daasuganu krut stuti

नरसिह पुर अतिपवित्र कृष्णा तीरी |नांदतो तेथ सदैव नर केसरी |कडकडा स्तंभ मोडला प्रभू प्रकटला |
प्रल्हाद वरद हा दिवौकसी गायिला | चमकतो पितांबर जरी पिवळा |लागली रुळाया जीभ हृदयी लळंलंळा|
खटखटा वाजती दंत मुकुट तो शिरी |प्रभू पापमतीचे पोट  विदारण करी |चमकती कर्णी कुंडले वन्ही लोचनी |
करी सहज लीलेने 'गुरगुर ' ऐसा ध्वनी |भीतसे पुढे जावया  कमललोचनी |इंदिरा म्हणे 'हे तेज न सौदामिनी '|
यापरी कधी न देखिला प्रभू आजवरी | उधळिली सुरांनी सुमने राहुनी दुरी | प्रल्हाद पाद वंदिता शांत जाहला |
ती नारसिह म्या सिहासनी देखिला | पुजू मी कश्याने सांग दयाळा तुला | ब्रह्मांड अससी व्यापुनी नससी वेगळा \
लाचार असे मी फार कृपा ती करी |मम पाप ताप आणि  दैन्य अवघे हरी |मन सदा विकल्पावरी स्थिर राहिना | 
छळी काम क्रोध मद मत्सर दुर्वासना | या अवघ्यासी  घालवी हीच याचना | तुज उदार मोठा म्हणती नारायणा |
भक्तार्थ तुझा अवतार अभय कर धरी इंदिरावरा या दासुगणुच्या शिरी |
 

No comments:

Post a Comment