Saturday, May 7, 2011


नरसिंहाच्या स्वयंभू मूर्ती बद्दल -
कोळे नरसिंहपूर येथील मूर्ती स्वयंभू आहे. असे म्हटले कि काही आधुनिक आंग्लभाषा विभूषित पंडितांना कसेसेच वाटते. त्यांचे माहिती साठी खालील खुलासा करीत आहे.
                           "आत्मानंद" या नावाचे एक M. A. LL. B. झालेले संसारी गृहस्थ आहेत. त्यांनी पूर्व वयात भारत भ्रमण केले असून त्यांना हिमालयातील हरिद्वार, ऋषीकेश, उत्तरकाशी वगैरे ठिकाणाच्या काही थोर विभूतींचा सहवास घडला आहे. ते साधक-निष्ठावान- चोखंदळ अभ्यासक  डोळस संशोधक आहेत. 'अज्ञाताचा शोध  बोध' आणि 'वैतरणेच्या ऐलतीरी ' हि त्यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांपैकी फारच अप्रतिम पुस्तके आहेत. त्यातील लागू पुरते काही उतारे खाली देत आहे. जिज्ञासूंनी वरील पुस्तके जरूर वाचावीत.
                            'अज्ञाताचा शोध  बोध' या पुस्तकात पान १३९ वर 'मॅडम डेव्हिडनील' या स्त्रीची हकीकत दिली आहे. ती स्त्री हिमालयात भ्रमंती करीत होती. ध्यानाची प्रचीती पाहणेच्या हेतूने तिने एका काल्पनिक लामावर आपले ध्यान केंद्रित केले  त्या काल्पनिक लामाला मूर्त स्वरुपात आणले. Thought forms materialise (जडत्व) कसे पावू शकतात याची उत्कृष्ट हकीकत पुराव्यासह दिली आहे. देवतांचे प्रतीकात्मक स्वरूप कसे  त्यांना विचारातून कसे आकारात आणता येते याचे समर्पक विवेचन केले आहे. जिज्ञासूंनी ते मुळातूनच वाचावेमॅडम डेव्हिडनील यांना काल्पनिक लामावर आपले ध्यान केंद्रित करून जर जिवंत मूर्तिमंत लामा प्रकट करता येतो तर मग परशरासारख्या थोर तपस्वी ऋषींनी नृसिंह मूर्ती पाहणेवर आपले ध्यान केंद्रित करून 'स्वयंभू' नरसिंह मूर्ती प्रकट करणे कसे अशक्य आहे?
                             नुसत्या विचारावर आत्मशक्ती केंद्रित केली तर त्या स्पंदनापासून देवादिकासारख्या मूर्ती प्रत्यक्षात आणता येतात. Dynamics of Yoga या श्री सत्यानंद यांचे पुस्तकात पान ८८ वर त्यांनी म्हटले आहे कि :- "Sound can be converted into an object and object can be Disintegrated into atomic particles", यावरून नादाचे महत्व कळून येईल.
                             ध्वनिपासून कोणताही पदार्थ उत्पन्न होऊ शकतो. याचे प्रयोग रशियात सुरु असून त्यापैकी काही यशस्वी पण झाले आहेत. अनाहत ध्वनी पासून आत्मशक्तीचा आविष्कार होऊन इष्ट दैवत साक्षात प्रकट होणे यात अशक्य मानण्यासारखे किंवा विश्वास ठेवण्यासारखे काहीच नाही.
                              अनन्य सतत मंत्रजप किंवा नामजप यांनी जी कंपने उत्पन्न होतात त्यांची तीव्रता जितकी वाढत जाईल तितके आपले इष्टदैवत मूर्तस्वरूप धारण करू लागते. तो जप ती भावना पराकोटीची तीव्र तीव्रतम झाली म्हणजे आपली इछाशक्तीच त्या दैवताच्या जड स्वरुपात प्रकट होते
तात्पर्य- पराशर ऋषींच्या thought formsना  जडत्व पावून मूर्तिमंत नृसिंह प्रभू आकारात आले. म्हणून हि मूर्ती 'स्वयंभू' आहे असा आमचा रास्त दावा आहे.
प्रेम आणि प्रत्यय 
                             'अज्ञाताचा शोध बोध' या पुस्तकाचे लेखक आत्मानंद यांनी आपल्या पुस्तकात अमेरिकेतील 'ओरल रॉबर्ट' यांच्या जीवनातील साक्षात्कारी प्रसंग नमूद केला आहे. (पान २००)
                             ओरल रॉबर्टस यांना एक दिवस दृष्टांत झाला कि तू एक विविक्षित ठिकाणी जा. प्रार्थनेने रोगमुक्त करण्याचे सामर्थ्य, सिद्धी तुला मिळेल! प्रार्थनेवर अनन्य श्रद्धा ठेवून रॉबर्टस लिंडसे सेंटर या फिरत्या प्रार्थना मंडळातून भ्रमंती करीत होता. मुल शरीर संपदा अत्यंत क्षीण. वयाच्या सोळाव्या वर्षी गंभीर अपघाताने अंथरुणावर असताना क्षयाची भावना निर्माण झाली होती. पण श्रद्धेला यश आले. ओरल बरा झाला.
एक दिवस त्याला वरील दृष्टांत झाला.
सहस्त्रावधी रोगग्रस्त त्याने आजपर्यंत बरे केले आहेत. १९४६ साली रॉबर्ट्स धर्मगुरु झाला. त्याचे हे कार्य आजही सुरु आहे.
साक्षात्कार किंवा दृष्टांत हि मनाची दुबळी अवस्था किंवा धादान्त खोटेपणा मानणाऱ्या पाश्चात्य भौतिक पंडितांनी माहिती साठी पुढील पत्ता लक्षात ठेवून संपर्क साधावा
The Oral Roberts Evangelist Association Abundant Life (Bld) Tulsa oklshoma. U.S.A.
नरसिंहपूर हि एक साक्षात्कारी भूमी आहे. श्री नृसिंहभक्तांना इथे आलेला अनुभव, लाभलेला अनुग्रह हि एक स्वसंवेद्य गोष्ट आहे

No comments:

Post a Comment