Wednesday, May 11, 2011

shrinarasimha stavan

श्री नरसिंह स्तवन 
देवते ,कुलदेवते ,नरसिंह रुपिणी देवते,
प्रणिपात मी करितो तुला ,स्वीकार तो प्रेमामृते |
माजले जागी असुर सत्य सारे लोपले 
तामसाचे राज्य  जेव्हा चाहुदिशी  घोघावले 
तेधवा अवतार तू घेतला  खल -नाशानाते  देवते कुलदेवते |
सत्य, सुंदर,न्याय याचा नाश होता चालला 
नाम उच्चारावयाते वध होता घातला 
तेधवा स्तभातुनी तू अभय दिधले  मामुते देवते कुलदेवते |
आजि आमुच्या जीवनीची  भ्रष्टता  चेतावली 
नील निर्मळ जीवनाची  शाश्वतीही संपली 
नरसिंह , तू अवतार घे ,धेर्य दे,भय जिंकण्याते
प्रल्हादे  तुजला भक्तिभावे आळविते  |

                     वि.म . कुलकर्णी , पुणे 

No comments:

Post a Comment