Saturday, May 7, 2011

bhupali

भूपाळी ---
[चाल - घनश्याम सुंदरा ]
उषःकाल  हा येई महिवरी ,उठी सत्वर नरहरी, श्री हरी उठी सत्वर 
निशारमण निस्तेज  जाहला ,रवि येता अंबरी ॥ धृ 
द्रौपदिसाठी धावत गेला ,काय हस्तिनापुरी ? ||
कि तुडवाया चिखल गुंतला ,निशीदिनी  गोऱ्या घरी ? || 
दामाजीस्तव  त्वरे धावला ,बेदर दरबारी 
प्रल्हादे  पळविले  काय तुज ,स्तंभी गिरीकंदरी 
भक्तासाठी ऐसे धावुनी ,श्रम झाले बहुपरी ||
म्हणुनि काय ही गाढ नीज तुज , आली रे श्रीहरी ||
प्रार्थना परी आहे जगाच्या चालका तुजला 
दिक्प्राची प्रक्षाळी मुखाते सोडी शयनाला||
तू निद्रित म्हणूनिया आम्हासि कामादिक भिबविती 
दर्शनमात्रे तुझिया भवभय पळेल हे निश्चिती || 
उषःकाल  हा ------------- ||१ ||
सावळी मनोहर मूर्ती उभी तव एके पायावरी |
मुख सिंहाचे धरुनि नरहरी स्तंभी गुरगुर करी ||
दाढा दिसती बहुत भयंकर आयुधे शोभति करी |
चरचरचर चीरियला दैत्य तो घेवूनी मांडीवरी ||
ही कृती करुनी संध्यासमयी निशि निद्रा करी हरी |
पुरे पुरे तव झोप जाहला आकांत अवनीवरी ||
लोपला धर्म झाली जनता पाखंडी सारी |
उन्मत्त जाहले दैत्य तुझ्ह्याविण कोण तया आवरी ||
सोडुनि निद्रा ज्ञानार्वीचे तेज झणी पसरी |
म्हणुनि विनवितो देवा तुजला उठ आता झडकरी ||
उषःकाल  हा -----------|| २ ||
खग हे किलबिलरवे जणू तुज भूपाळी गाती |
" उदया येई भास्कर " ऐशी वर्दी तुज देती ||
कशी रंगली बघ ही प्राची सुरक्तरंगे अती |
निजकर किरणे दिनकर करितो जागृत जन जगती ||
जागे झाले विश्व सर्व तरि नीज न तव सरती |
महाद्वारी येउनिया समयी भक्त गर्जताती ||
केशवा , नारायणा , माधवा , गोविंदा , विष्णो |
मधुसूदन त्रैविक्रम वामन श्रीधर सद्बंधो ||
किती विनवू मी तुला दयाळा फोडूनिया टाहो  |
दयाघना भगवंत मती नित तव नामी राहो ||
  उषःकाल  हा --------------|| ३ ||

4 comments:

  1. Mi itka khush jhalo he vachun.. i felt rejuvenated..Venkatesh suprabhatam sarkhi bhupali va kya baat hain..dil khush ho gaya

    ReplyDelete
  2. its really awesome super i read it every morning and fell so good

    ReplyDelete
  3. i just feel likereading it every day and start my day

    ReplyDelete