Wednesday, May 18, 2011

स्थापना

व्यास ऋषी म्हणाले ,'काही  कल्प वर्षा पूर्वी माझे पिताजी  पराशर ऋषी श्री नृसिह  स्वरुप् कसे होते हे प्रत्यक्ष  पाहणे साठी कृष्णा तीरी उग्र तपश्चर्या करित होते. स्मृतिकार  पराशराची योग्यता फ़ार् मोठी होती.ते   वशिष्ठ ऋषी चे नातू असून ऋग्वेदातील सूक्ताचे रचनाकार होते .त्याच्या तीव्र तपामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले व वर माग म्हणाले .' मी भगवान नरसिहा शिवाय कोणाकडून वर घेणार नाही 'असे पराशर म्हणताच श्री शंकर गुप्त झाले व पराशरांनी पुन्हा तपास आरंभ केला तेव्हा हे नरसिह स्वरूप पराशरापुढे उभे राहिले .नंतर नर सिहाने विचारले 'तुझे समाधान झाले ना ?मग मी वर राहू शकत नाही 'या  प्रमाणे पराशर ऋषी ना प्रत्यक्ष दर्शन दिलेली मूर्ती या ठिकाणी कृष्णा डोही विसर्जित  केली गेली .कालांतराने  ब्राह्मणाला  दृष्टांत झालेल्या प्रमाणे इ .स .१७८ चे सुमारास राजा भीम देवाने ही  मूर्ती डोहातून वर काढली व ती इथेच स्थापना केली तेच हे कोळे नरसिहपूर होय .

No comments:

Post a Comment