येथील उत्सव वैशाख शुद्ध सप्तमी पासून साधारणपणे दहा दिवस असतो. त्या वेळी उत्सव मूर्तीचे दालनातील भव्य सिंहासनावर विराजमान होत असते. उत्सवाचे काळात दशमी पासून प्रतिपदेपासून श्रींची पालखीतून नगरप्रदक्षिणा असते. उत्सवाची समाप्ती वैशाख वद्य प्रतिपदेला होते. त्या दिवशी दुपारी १२ चे सुमारास अवभृत स्नानास श्रींची स्वारी मंदिराचे बाहेर पडते. ज्वाला तीर्थावर उत्सवमूर्तीस कृष्णा स्नान होते. तेथेच मंगल आरती व पंचपदी होते व पालखी पुन्हा मंदिरात येते. लळीताच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होऊन मानकरी लोकांना श्रीफलाचा प्रसाद दिला जातो. दुसरे दिवशी सर्व ग्रामस्थ मंडळींना आपल्या हरिजन बांधवांसह महाप्रसादाचे भोजन दिल्या नंतर उत्सवाची सांगता होते. हा उत्सव सर्व नागरिकांना भक्तिमार्गाने सामाजिक समतेची दीक्षा देणारा दीक्षांत समारोहच आहे.
No comments:
Post a Comment