संत रामदास कृत श्री नागदेवाची आरती
मही धरोनी माथा ऐसे तू जाणे
शंकर कंठी मिरवी तुझे भूषणे ।
सकळांच विश्वास तुजपाशी जाणे
म्हणोनी अमृत कुंडे ठेवी रक्षणे ॥१ ॥
जयदेव जयदेव जय नागेशा
आरती ओवाळू तोडू भवपाशा ॥धृ ॥
सूर्याच्या रथाचे वारू जाउनी लंकेची
निळे करुनी सत्य दावी मातेसी
ऐसा प्रताप तुझा कळला देवासी
म्हणोनी अखंड नामे भजतो नागेशी ॥
मार्गेश्वर पंचमीस तू पाव
तुझे नामे लोक करिती उत्सव
प्रसन्न होऊनी त्याचा पुरविसी निर्वाह
तुझे चिंतन केलीया
दासा नीज बोधी नाव ॥
No comments:
Post a Comment