आरती
आरती श्री नरसिहाची।अच्युत भक्तवर प्रभुची॥धृ ॥
पाहुनी प्रल्हादाची भक्ती ।धरिली अद्भुत ती मूर्ती ॥
गुरगुर शब्द कानी पडती ।दचकला असुर तो चित्ती ॥
स्तंभी मुष्टी घात केला ।कडकडे स्तंभ ,गडगडे नभ ,धरुनी देवे
सिहाची गर्जना केली ॥आरती ॥
बसला जाउनिया द्वारी ।घेउनी त्या मांडीवरी ॥
फोडिले पोट चीरीचिरी।नखे खुपशिली उदरी ॥
घेतला प्राण असुराचा ,तोषले सुर,कपि मुनिवर ,मनुज सुखकर ,
लाज राखी नीज भक्ताची ॥वाणी राखिली ब्रह्मयाची ॥आरती ॥
सिह मुख दिसे भयंकर ।दाता चावितसे करकर ॥
जिव्हा लोळे चरचर।शोभे आयाळ सुंदर ॥
शोभला आतडीने गळा ,भक्त प्रभुपाया ,लोळे लवलाही ,
दया मनी येई ,वाणी राखिली प्रल्हादाची ॥राखी लाज त्रिम्बकाची॥
आरती श्री नरसिहाची।अच्युत भक्त वर प्रभुची ॥
No comments:
Post a Comment