Thursday, April 21, 2011

महाराष्ट्रातील काही नरसिहाची मंदिरे




महाराष्ट्रातील काही नरसिहाची मंदिरे 

कोळे नरसिह्पूर- येथील प्राचीन मंदिर स्वयंभू मूर्ती 
सांगवडे- कोल्हापूर येथील श्री नृसिहासंहारक मंदिर 
धोम- सातारा येथील नरसिंह मंदिर 
कुडाळ- सिंधुदुर्ग येथील फणसाच्या लाकडाची मूर्ती,येथे सुपारीचा कौल लावतात.
बाभूळगाव- कुर्डूवाडी येथील नरसिहाचे मंदिर 
ताथवडे- पुणे येथील वालुकामय मूर्ती 
रांजणी- पुणे येथील नरसिहाचे मंदिर म्हणजे क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके याचे आश्रय स्थान होते .लाखोजीबुवा ब्रह्मे यांच्यास्वप्नात साक्षात्कार झाला नीरा नरसिहाचे येथे आगमन झाले .
पुणे- येथील कारकोळ पुरा येथील जोशी याचे मंदिर 
कोपर्डे- कराड जवळ शिव कालीन मंदिर नारायण दिवाकर [कृष्ण  दयार्णव याचे वडील ]स्वप्न साक्षात्कारा नुसार मंदिर स्थापना .
रायबाग- येथील मंदिर 
राहेर- नगर येथील मंदिर याचे वर्णन दासू गणु नी केले आह .
भातोडी-  नगर जिल्ह्यातील ११ व्या शतकातील सुंदर शिल्प असलेले मंदिर 
त्र्यंबकेश्वर- येथे कुशावर्त  कुंडाजवळ  हे क्षत्र आहे .
सिन्नर- यादवकालीन शिव पंचायतन यात नरसिहाचे मंदिर 
निफाड- स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाचा तांदळा स्वरूपात नरसिहाचे दर्शन .
जळगाव- बालाजी मंदिरात डाव्या बाजूला नरसिहाचे मंदिर 
गणेशलेणे- या प्राचीन लेण्यात नार्सिहाची मूर्ती आहे .
सायखेड- गोदावरी शिवणा  याच्या संगमावर बेटावर हे मंदिर असून या बेटाला मणि पर्वत असे म्हणतात मध्वमुनिश्वरांनी  या नरसिहाची गौरव पडे रचली आहेत .
पैठण-  संत एकनाथाच्या वाड्यापासून जवळ एका मंदिरात वामललित आसनातील नरसिहाची काळ्या पाषाणाची सुंदर मूर्ती आहे .
निलंगा- येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिरात शिव नरसिहाची उत्कृष्ठ मूर्ती आहे 
घनसांगवी- येथे हेमाड पंथी नरसिहाचे मंदिर .येथे धानस्थ मूर्ती आहे .
बीड- उत्तराभिमुख मंदिर.येथे दासोपंत याची समाधी आहे .
राक्षसभुवन- येथेही नरसिहाचे मंदिर आहे .
शेळगावनांदेड जिल्ह्यातील मांजरा लेडी संगमावर शिव मंदिरात नार्सिहाची मूर्ती याला योग नार्सिहाची मूर्ती म्हणतात 
नांदेडशहराच्या होळी भागात हे मंदिर असून किल्ल्यातही आणखी एक मंदिर आहे 
टेम्बुर्णी-  येथेही मराठा शैलीचे मंदिर आहे 
नरसीपरभणी  जिल्ह्यात हे क्षेत्र येते 
मानवतयेथे तांदळ्याच्या स्वरुपात  नरसिहाचे दर्शन होते 
राजापूरपरभणी येथे हे क्षेत्र येते 
पोखरणीपूर्वीचे नाव पुष्करणी येथे साळापुरीचा नरसिहाचे आगमन झाले.
वरुडयेथे द्विभुज आसनस्थ नरसिहाची मूर्ती आहे 
धर्मापुरीपरभणी येथे हे क्षेत्र असून येते अनेक नरसिहाच्यामूर्ती आहेत तेजोमय,पर्णमय,पीत,श्वेत,जालस्थ ,पर्जन्य अशा देवता आहेत.

2 comments:

  1. Pusad: yethe junya pusad bhagat pus nadikathi bhumigat narsinhacha mandir aahe...!

    ReplyDelete
  2. shegaon javal JANORI ya gavat LAKSHMI - NARSIMHACHE mandir aahe. Murti atishay rekhiv aahe.Aniruddha Kavishwar

    ReplyDelete