Monday, November 1, 2010

विविध संतांनी केलेले नृसिंह स्तवन

विविध संतांनी केलेले नृसिंह स्तवन

            
                 संत  ज्ञानदेव(विभूतीयोग) अध्याय दहावा
 

अगा दैत्याचीया कुळी प्रल्हाद तो मी न्याहाळी
म्हणोनी दैत्याभावादी मेळी लेपेचिना II

पै कलितया  माजी महाकाळू ,तो मी म्हणे गोपाळू  I
 श्वापदाआंतु शार्दुलूतो मी जार  II
पक्षीजाती  माझारी I गरुड तो मी अवधारी
यालागी  ते पाठवरी वाहो शके माते II


संत तुकाराम  

अग्नी कुंडामाजी घातला प्रल्हाद तरी तो गोविंद विसरेना II
पितयासी म्हणे व्यापक श्रीहरी नांदतो मुरारी सर्वा ठायी II
अग्निरूपे माझा सखा नारायण प्रल्हाद गर्जुनी हाक मारी II
तुका म्हणे अग्नि झाला शीतळ प्रताप सबळ विठो तुझा II
नामाचे सामर्थ्य कारे दाडीसी का रे विसरशी पावाडे हे II
खणखणा हाणती खड्ग प्रल्हादासी रुते अंगासी किंचितही II
राम कृष्णां हरी ऐसी मारी हाक तेणे पडे धाक  ,बळीयांसी  II   
सोद्या सामर्थ्य ऐसी या कीर्तीची आवडी तुक्याची  भेटी देई II
वाटीभर विष दिले प्रल्हादा  निर्भय मानसी तुझ्या बळे vII
भोक्ता नारायण  केले ते प्राशन  ,प्रतापे  जीवन  झाले तुया II ,
 नामाच्या चिंतेने विषाचे ते आप ,जाहले देखत  नारायणा II
 तुका म्हणे ऐसे तुझे बडीवार  शिणला फणीवर वर्णवेना  II
 डळमळता मेरू आणि तो मंदार पाताळी  फणीवर ,डोई  झाडी II 
लोपे तेजे सूर्य आणिक हा  चंद्र  कांपतसे इंद्र  थरथरा II
रूप उग्र हरीने धरिले  दैत्या मारियले मांडीवरी II
 तुका म्हणे भक्ता, कारणे श्रीहरी  बहु दुराचारी  निर्दाळले II
 प्रल्हाद कारणे नरसिंह  झालासी त्याचिया बोलासी  सत्य केले II
  रामकृष्ण गोविंद नारायण हरी  गर्जे राज द्वारी भक्त राज II
विठ्ठल माधव मुकुंद केशव  तेणे दैत्या राव  दचकला II
तुका म्हणे त्या कारणे सगुण  भक्ताचे वचन सत्य  केले IIII   






No comments:

Post a Comment