जय जय नरसिंहा जय जय नरसिंहा |
आकळे नकळे तुझा पार II धृ II
भक्तभूषण दीनदयाळा हरी| दीनवत्सल हरी I
प्रल्हादासी रक्षिले नानापरी ||१ ||
भावार्थ प्रल्हादभक्ते दाखविला|
भक्ते दाखविला |
त्याच्या भावार्थे स्तंभी प्रकट झाला||२||
हरिजनाचा द्वेषी सारियेला |
द्वेषी सारियेला |
दास प्रल्हाद देवे रक्षियेला ||३||