Wednesday, June 8, 2011

औदुंबर वरदान

औदुंबर वृक्षाला दिलेले वरदान व नृसिंह सरस्वतीच्या अवताराचे वैशिष्ट्य 
श्री महाविष्णु हिरण्य कश्यपुचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले .प्रल्हादाचे  त्यानी  रक्षण केले आणि हिरण्यकश्यपु वधानंतर त्याला राज्यावर बसविले.काहि कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली .आणि पुढे त्याचेच औदुम्बर वृक्षात रुपांतर झाले .प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुम्बराच्या वृक्षाची पूजा करू लागला.प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिले व ज्ञान बोध केला. प्रल्हादास द्वेतसिद्धांताविषयी आसक्ती असलेच्या जाणून घेऊन, श्री दत्तप्रभूनी कलियुगात यातीवेश धारण करून दिन जनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता. परम पवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्याकृती धारण करुन्श्री दत्तांच्या चरण कमलावर पडून मला सुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली तेव्हा श्री दत्तात्रेय म्हणाले " प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रुपात राहीन. तुझ्या मधून नरसिंह देव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार धारण करीन, असे माझे वाचन आहे."
स्वामींचे वक्तव्य ऐकून मी म्हंटले " महाराज श्रीपिठीकापुरम येथे श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या बाललीला ऐकण्यासाठी मन सदैव लालचावलेले असते." 
                             (श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत अध्याय चौदावा) 

No comments:

Post a Comment