Saturday, December 4, 2010

श्री नृसिंहाची आरती

कडकडिला स्तंभ गडगडले गगन 
अवनी होत आहे कंपायमान 
तडतडली नक्षत्रे पडताती जाण
उग्र रूपे प्रगटे तो सिंहवदन 
जयदेव जयदेव जय नरहरी राया 
आरती ओवाळू महाराजवर्या  जय देव जय देव II धृ II
एकवीस स्वर्ग माळा डळमळली कैसी
ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी
चंद्र सूर्य तारा लोपती प्रकाशी
कैलासी शंकर दचके मानसी II1II
वैशाख मासी शुक्ल चतुर्दशी
स्वाती नक्षत्रासी अवतार घेसी
ऐसे महाराज भक्ता पावसी
प्रसन्न सत्वर  झाला प्रल्हाद यासी II2II
प्रल्हाद भक्त बहुत गांजीला
नरहरी नरहरी म्हणुनी धावा जो केला
धावे पावे तो नरहरी पावला
हिरण्यकशिपु मर्दुनी  भक्त रक्षिला II3II
थरथरती त्या जटा जिव्हा लळलळीत 
तीक्ष्ण नखांनी तो दैत्य विदारीत
अर्धांगी कमलजा शेष छायेत 
माधवदासा स्वामी नरहरी शोभत II4II




















No comments:

Post a Comment