Monday, September 13, 2010

मूर्ती वर्णन

हे नारायणा ! तुझे मुख मंडळ भाव्योदत्त स्वरूप निधान ,दिव्य तेजोवलय व्यापून खाली रुळणारी तुझी आयाळ खरोखरच तुला



" ज्वलंतं सर्वतोमुखं " ठरवणारी आहे .आपल्या सिंह नादाने गलित गात्र व्हावे अशी गर्जनेची जाणीव देणारी जिव्हा ,कृतकृत्यावर दृष्टी ठेवणारे तेजपुंज नेत्र ,आर्त भक्तांची हक चटकन ऐकता यावी म्हणून उभारलेले कर्ण ,विशाल भाल प्रदेश आणि त्यावर धारण केलेला किरीट ,तुझे दर्शन खरोखरच अपूर्व आहे.


हे प्रभो ! आपला अंत होऊ नये म्हणून अनंताला कोंडीत पकडणारा क्रूरकर्मा हिराण्याकाशिपुचा उंबरठ्यावर तू आपल्या मांडीवर आडवा केला आहेस .आपला उजवा पाय उंबरठ्यावर भक्कमपणे टेकवून ठेवला आहेस .तू तुझ्या मांडीवर हिराण्याकाशिपुला पूर्ण जखडून टाकले आहेस .डाव्या पायच्या लवणीत दैत्याचा ढालीसह हात निष्प्रभ करून आपल्या हाताने दैत्याचा उजवा खड्गधारी हात पकडून ठेवा आहेस .उजवा हाताने दैत्याचा उजवा पाय धरून स्वतःच्या उजव्या उरू- सामर्थ्याने त्या दैत्याचा डावा पाय मुडपून ठेवला आहेस. ब्रह्मदेवाचा शब्द खोटा ठरू नये म्हणून वज्राधिक नखस्पर्शाने तू हिराण्याकाशिपुचे पोट कसे विदारण केले असशील ते तुझे नखाग्र दैत्याच्या उदरात घुसलेली पाहून आकलन झाले.



हे नरहरे ! पाशवी सामर्थ्याचा अंत करून शत्रूच्या शिरावर आपला कृपाहस्त ठेवला आहेस .धन्य तुझी करुणा !









प्रभावळीचे दशावतार ठळक व आकर्षक दिसत आहेत ,कीर्तीमुख हे आगळे आणि भव्य आहेत .शेषाचा वेढा असल्या प्रमाणे वळणाची महिरप मूर्तीच्या पार्श्वभागी आहे.






देवतेच्या डाव्या पायाजवळ भक्तप्रल्हाद व लक्ष्मी यांच्या सुबक मूर्ती आहेत.







देवतेच्या उजव्या पायाजवळ भूदेवी व गरुड यांच्या सुबक मूर्ती आहेत .


























विश्वव्यापी नरहरीचे पाउल व लक्षवेधी अंगठा .











श्री  नरहरीचे  नयनरम्य मुखमंडल




शांत स्वरूपातील श्री श्यामराज








1 comment: